आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारी आमदारांच्या टीकेनंतर घोषणा; दुष्काळावर पॅकेज 2685 कोटींचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सत्ताधारी आमदारांनीच विधिमंडळात सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी 2685 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. निधीवाटपामध्ये कोणत्याही प्रकारे भेदभाव होत नसल्याचे स्पष्टीकरणही सरकारकडून विधानसभेत देण्यात आले. निधीवाटपाचे अधिकार राज्यपालांना असून कोणीही कोणाचा पैसा पळवत नसल्याचे मदत व पुनवर्सन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, संबंधित विभागांचे सचिव आदींनी मंगळवारी बैठक घेऊन विविध कार्यक्रम राबवण्याबाबत आढावा घेतल्याचे ते म्हणाले. सरकारने जाहीर केलेल्या 2685 कोटींच्या पॅकेजमध्ये महात्मा फुले जल अभियानासाठी 100 कोटी, वैरण विकासासाठी 50 कोटी रुपये, दहा हजार शेततळ्यांसाठी 100 कोटी रुपये, सूक्ष्म सिंचनासाठी 50 कोटी रुपये आदी विविध योजनांचा समावेश असल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच विदर्भ सिंचनासाठी 6 हजार कोटी रुपयांची योजनाही असल्याचे ते म्हणाले. दुष्काळी स्थितीबाबत काँग्रेस आमदार सदाशिवराव पाटील यांनी प्रस्ताव मांडला. तसेच प. महाराष्ट्रात सर्व निधी मंत्री पतंगराव कदम व आर. आर. पाटील यांच्याच जिल्ह्यांत जात असल्याचेही आमदारांनी सुनावले. प्रस्तावाला उत्तर देताना पतंगरावांनी हे आरोप फेटाळून लावले. राज्यपालांना निधी वाटपाचे अधिकार असून आमदारांनी अभ्यास करून बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला. दुष्काळग्रस्त 15 तालुके हे भूजल सर्वेक्षण अहवालानुसार ठरवण्यात आले असून त्यामध्ये भेदभाव केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिथे बांधण्यात येणारे बंधारे कार्यक्रम राज्यात इतरत्रही राबवला जाईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच दुष्काळग्रस्त भागांसाठी 31 जुलै पर्यंत टँकर, चारा आदी सुविधा देण्याची मुदत वाढवली असल्याचेही कदम यांनी सभागृहात जाहीर केले. दरम्यान, दुष्काळाची चर्चा दुपारी दोन वाजता सुरू झाली तेव्हा सत्ताधारी आणि विरोधकांचे मिळून जेमतेम 50 आमदार उपस्थित होते. मंत्र्यांमध्ये केवळ युवा व क्रीडा मंत्री वळवी उपस्थित होते. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड व मदत-पुनवर्सन मंत्री पतंगराव कदम आले. भाजपचे पहिले दोन बेंच तर रिकामेच होते.
मान्सून देशभर बरसला, पण 23 टक्के कमी
नवी दिल्ली - केरळात पाच दिवस उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने बुधवारी देशभर व्याप्ती वाढवली. मात्र, सरासरीपेक्षा 23 टक्के पाऊस कमी झाल्याने स्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात पाण्याची टंचाई तसेच तृणधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या वाटचालीबाबत बुधवारी कृषिमंत्री शरद पवार, अन्नमंत्री के.व्ही थॉमस यांची हवामान खात्यातील अधिकाºयांशी चर्चा झाली. हवामान खात्याचे महासंचालक एल.एस. राठोड म्हणाले की, आगामी काळात साधारण पर्जन्यमानाची शक्यता आहे.
तृणधान्यांची काळजी- ओडिशा, छत्तीसगडमध्ये चांगला पाऊस आहे. त्यामुळे तांदळाची अडचण नाही. मध्य प्रदेश, गुजरातेत चांगल्या पावसाने भुईमूग, सोयाबीनची पेरणी चांगली झाली आहे. तृणधान्यांची स्थिती फारशाी चांगली नाही. असे असले तरी अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. किमतीवर परिणाम होणार नाही.’- शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री
दुष्काळी निधी: पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप, सरकारच्या अडचणीत भर
13 कोटींचा निधी आला, तरी छावण्या सुरू नाहीत