आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यातील आणखी एक तरुण ISIS मध्ये दाखल ; खुद्द तरबेज तांंबेने दिली कुटुंबियांना माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा परिसरातील आणखी एक तरुण इसिसमध्ये दाखल होण्यासाठी भारताबाहेर गेल्याचे समोर आले आहे. तबरेज नूर मोहम्मद तांबे असे या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे नाव असून एटीएसने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे
.
तबरेज काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त सौदी अरेबियातील रियाध शहरात वास्तव्याला होता. या वास्तव्यात अली नावाच्या इसिसच्या हस्तकाशी त्याचा परिचय झाला. अली आणि तबरेज हे दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. काही दिवसांनी तबरेज भारतात परतला.
मात्र त्यानंतरही तो अलीच्या संपर्कात होता. काही दिवसांपूर्वी तबरेज इजिप्तला रवाना झाला. त्यानंतर तो तिथूनच लिबिया गेला असून सध्या तो इसिसमध्ये सक्रिय झाल्याची माहिती तबरेज तांबेच्या भावानेच मुंबईच्या एटीएसला दिली.
त्याआधारे एटीएसने काळाचौकी पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. या प्रकरणी आता तपास सुरू आहे.
तरबेजने खुद्द कुटुंबीयांना दिली माहिती...
तबरेज तांबे, सौदी अरेबियातील अली नावाच्या एका मित्रासोबत आधी इजिप्तला गेला. तेथून दोघे लीबियाला पोहोचले आणि ISIS मध्ये सहभागी झाल्याचे तबरेजचा भाऊ सौद नूर मोहम्मद तांबे याने पोलिसांनी सांगितले.

अलीने केला तबरेजचा ब्रेनवॉश...
पोलिसांनी सांगितले की, ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी अली याने तबरेजचा ब्रेनवॉश केल्याचा संशय आहे. रियाधमध्ये दोघे सोबत काम करत होते. अली आधीपासूनच ISIS च्या संपर्कात असावा. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मुंबईतील तीन तरुण ISIS मध्ये झाले होते दाखल...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...