आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑटो रिक्षात सापडले तीन दिवसांचे अर्भक, या देवदूताने \'ट्विटर\'वर मागितली मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'देव तारी त्याला कोणी मारी', या म्हणीचा प्रत्यय नुकताच मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात आला. बंद पडलेल्या ‍ऑटो रिक्षात एका तरुणाला तीन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. तरुण जणू या अर्भकासाठी देवदूतच ठरला. त्याने या अर्भकांसाठी 'ट्‍विटर'वर मद‍त मागितली. सध्या हे अर्भक पोलिसांच्या देखरेखीखाली आहे.

 

भुकेने व्याकूळ असलेल्या अर्भकाला जीवदान देणार्‍या तरुणाचे अमन असे आहे. अमन काल (रविवारी) रात्री 10 वाजता कांजूरमार्ग परिसरातून जात होता. तेव्हा त्याला एका बंद पडलेल्या रिक्षातून बाळाचा रडण्याचा आवाज आला. काय करावे आणि काय नाही, हे अमनला सुचत नव्हते. त्याने मुंबई पोलिसांना ट्वीट करून मदत मागितली.

 

अमनच्या ट्‍वीटला मुंबई पोलिसांनी तत्काळ  प्रतिसाद देत संपूर्ण माहिती जाणून घेतली. नंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या हे बाळ कांजूरमार्ग(पूर्व) पोलिस ठाण्यात असून महिला कॉन्स्टेबल काळजी घेत आहे. अमनच्या या उत्कृष्ट कामाबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जाते आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो   

बातम्या आणखी आहेत...