आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीत दुचाकीसह नाल्यात वाहून गेला युवक; कल्याणमध्ये घराची भिंत कोसळून 2 ठार, 6 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात पहाटे 5 वाजता अतिवृष्टीने घराची भिंत कोसळली. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात पहाटे 5 वाजता अतिवृष्टीने घराची भिंत कोसळली. (संग्रहित फोटो)
मुंबई/ठाणे- भिवंडीत ओसवालवाडी येथे दूध विक्री करणारा एक 24 वर्षांचा युवक दुचाकीसह नाल्यात पडून वाहून गेला आहे. तर कल्याणमध्ये घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 6 जण जखमी झाले आहेत. 
 
अतिवृष्टीने कोसळली घराची भिंत
कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात पहाटे 5 वाजता अतिवृष्टीने घराची भिंत कोसळली. त्यावेळी सर्व जण झोपेत होते. सैफुद्दीन अल्लाउद्दी खान (वय 45) आणि इस्लाम निजामुद्दी शेख (वय 45) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. 
 
या घटनेत परवेश बन्सलराज सिंग (वय 26). फिरदोस इस्लाम मोहम्मद शेख (वय 38), खुशबू सैफुद्दीन शेख (वय 16). निलम प्रवेश सिंग(वय 28) हे या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांना उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी सोना मोहम्मद इस्लाम शेख (वय 11) या चिमुकलीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

भिवंडीत युवक गेला वाहून 
हॅपी सुरेश कनोजिया (रा. आदर्श टॉवर, भिवंडी) असे या नाल्यात पडून वाहून गेलेल्या युवकांचे नाव आहे. दूध विक्री करुन तो घरच्या दिशेने जात होता. त्याची दुचाकी नाल्याजवळ असणाऱ्या रस्त्यावरुन घसरली. त्यामुळे तो दुचाकीसह नाल्यात पडला आणि वाहून गेला. 
बातम्या आणखी आहेत...