मुंबई - पाच वर्षे वय पूर्ण केलेली मुले पहिलीसाठी तर तीन वर्षे पूर्ण केलेली प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी पात्र ठरणार आहेत. शाळा प्रवेशाबाबत शिक्षण विभागाने बुधवारी परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला.
शासनाच्या ११ जून २०१० रोजीच्या निर्णयानुसार आजवर पूर्व प्राथमिकस्तर ते इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात होते. या निर्णयान्वये पाच वर्षे पूर्ण झालेले बालक पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात आले होते. मात्र पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी वयाची निश्चिती करण्यात आलेली नव्हती. त्यासंबधात उपायोजना सुचवण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीने दिलेला अहवाल शालेय शिक्षण विभागाने स्वीकारला आहे.
प्रवेशाच्या अटी
* प्ले ग्रुप, नर्सरीसाठी तीन वर्षे, पहिलीसाठी ५ वर्षे वय ३१ जुलैपर्यंत पूर्ण हवे. २०१५-१६ पासून अंमलबजावणी.
पुढे वाचा पहिली प्रवेशाचे निकष