आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: सेल्फी बेतली जीवावर; तरूणीचा मृत्यू, दोघींना वाचवले, वाचवणारा बेपत्ता!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वांद्रेतील बँडस्टॅन्ड येथील समुद्रकिनारी सेल्फी काढताना तीन तरूणी समुद्रात पडल्याची घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. यात दोन तरूणींना वाचवण्यात एका तरूणाला यश आले आहे. मात्र, तिस-या मुलीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोन तरूणींना बाहेर काढल्यानंतर तिस-या मुलीस वाचवायला गेलेला रमेश नावाचा तरूण समुद्रात बुडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेव्हीचे गार्ड व अग्निशमन दलाचे जवान त्याचा समुद्रात शोध घेत असून तो अद्याप बेपत्ता आहे. प्रत्यक्षदर्शिनीनी रमेश बुडाल्याचे व त्याचे डोके समुद्रातील पाण्यात दिसल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरन्नूम नावाची तरूणी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या दोन मैत्रिणींसह वांद्रेतील बँडस्टॅन्ड येथील समुद्र किना-यावर फिरायला आली होती. त्यांनी तेथील समुद्रकिना-यावर असलेल्या दगडांवर उभे राहून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तोल गेल्याने त्या तिघीही थेट समुद्रात पडल्या. तेथेच उभा असलेला रमेश वाळींज नावाच्या तरूणाने या तरूणींना वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतली. रमेशने दोन तरूणींना वाचवले व बाहेर काढले. तिस-या मुलीला बाहेर काढण्यासाठी त्याने उडी घेतली असता लाटेने तो समुद्रातील पाण्यात ओढला गेला. यानंतर काही मिनिटांतच तोही बेपत्ता झाला. दरम्यान, बुडालेल्या तिस-या मुलीचा मृतदेह तासाभराने आढळून आला. मात्र, रमेश नावाच्या तरूणाचा मृतदेह अद्याप आढळून आला नाही. तो बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळी समुद्रात एक प्रेमीयुगल कपल बुडाल्याचे सांगितले जात होते. मात्र, तसे नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुढे वाचा व पाहा....
बातम्या आणखी आहेत...