आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुफान हिट झालेला थ्री इडियट्स’ तामिळमध्ये सुपरहिट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: विधू विनोद चोप्रा यांचा तुफान हिट झालेला ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाची निर्मिती तामिळमध्ये करण्यात आली असून हा चित्रपट सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे. तामिळ भाषेत या चित्रपटाचे नाव हे ‘ननबन’ असे आहे. तसेच यामध्ये आमिर खानची भूमिका सुपरस्टार विजय याने साकारली आहे तर अभिनेत्रीच्या भूमिकेत इलियाना डिकून झळकली आहे.
सध्या तामिळमध्ये या चित्रपटाचे बुकिंग एकदम फुल असल्याचे सूत्रांनी सांगितले. या चित्रपटाचा रिमेक शंकर यांनी केला आहे. तसेच त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा आजवरचा 11वा चित्रपट आहे. विजय हे अधिक करून अँक्शन चित्रपट करत असतात. मात्र त्यांना हिंदीतील ‘थ्री इडियट्स’ आवडल्याने या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. याआधीही चीनमध्ये ‘थ्री इडियट्स’ने चांगली कमाई केली होती. चीनमध्ये या चित्रपटाने जवळपास 15 कोटींचा गल्ला काही दिवसातच गोळा केला होता. या चित्रपटातील शर्मन आणि महादेवन यांच्या भूमिका या तामिळ चित्रपटातील दुय्यम दर्जाच्या कलाकारांनी साकारल्या आहेत. तरीदेखील तामिळमध्ये या चित्रपटाला चांगले ओपनिंग मिळाले आहे. शंकर यांच्या ‘रोबोट’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात रजनीकांत आणि ऐश्वर्या यांच्या प्रमुख भूमिका होत्या.