आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन आमदारांचे निलंबन मागे घेणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळामध्ये आमदारांनी पोलिस अधिका-याला मारहाण केल्याप्रकरणी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती मंगळवारी आपला अहवाल विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्याची शक्यता असून तो अहवाल याच अधिवेशनामध्ये सभागृहामध्येही ठेवला जाणार आहे. तसेच त्यामध्ये विरोधी पक्षांच्या तीन आमदारांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस असण्याचीही शक्यता असल्याचे समजते.

दोन आठवड्यांपूर्वी नेमलेल्या या समितीने या प्रकरणाशी संबंधित आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम, जयकुमार रावल, राजन साळवी आणि प्रदीप जैस्वाल तसेच पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. त्यानंतर विधिमंडळ सुरक्षा अधिकारी, सीसीटीव्ही ऑपरेटर, पोलिस अधिकारी, जे. जे. रुग्णालयाचे डीन डॉ. टी. पी. लहाने आदींकडूनही या समितीने माहिती घेतली होती. त्यावरून समितीने निष्कर्ष काढला असून विधिमंडळाला आपल्या शिफारसीही केल्याचे समजते. मारहाणीचा आरोप जरी पाच आमदारांवर करण्यात आला तरी क्षितिज ठाकूर व राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोक्षी आमदार जयकुमार रावल, राजन साळवी आणि प्रदीप जैस्वाल यांना एक वर्षाच्या निलंबनाच्या शिक्षेतून दिलासा मिळू शकतो, असे सूत्रांनी सांगितले