आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हिडिओ बनविल्याप्रकरणी तिघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक चित्र - Divya Marathi
प्रतिकात्मक चित्र
मुंबई- दादर परिसरात राहणा-या एका अल्पवयीन मुलीवर दोन महाविद्यालयीन तरूणांनी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. दोन तरूणांनी तिच्यावर रेप केला तर तिस-याने त्यांचे व्हिडिओ बनविले आहेत. मुलीच्या कुटुंबियांनी या तीन तरूणांविरूद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. कुणाल वाघेला, करण रूमदे आणि सेबेस्टियन अल्फोंसो अशी अटक केलेल्या महाविद्यालयीन तरूणांची नावे आहेत.
पीडित मुलीने काय म्हटले..
पोलिसांना दिलेल्या जबाबत संबंधित अल्पवयीन मुलीने सांगितले की, ऑगस्ट 2014 मध्ये ती आपला लहानपणीचा मित्र याला भेटण्यासाठी महालक्ष्मी परिसरात असलेल्या एका कॉलेजमध्ये गेली होती. दोन दिवसानंतर तिला फोन आला व फोन करणा-याने तिला त्याचे नाव कुणाल असे सांगितले. कुणालने तिला तुझ्याशी मला मैत्री करायची असल्याचे सांगितले. यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले. सप्टेंबर 2014 मध्ये कुणालने तिला भेटण्यासाठी एका हॉटेलात बोलावले. त्यावेळी तू मला आवडते, मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले. त्यानंतर कुणालने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचदिवशी हॉटेलात बलात्कार केला. त्यानंतरही ऑक्टोबर महिन्यात कुणालने तिला आपल्या घरी बोलावले व पुन्हा बलात्कार केला. त्यादरम्यान करण नावाच्या तरूणाने कुणाल व मुलीचा व्हिडिओ बनवला.
दोन महिन्यानंतर करणने मुलीला फोनवरून ब्लॅकमेल करणे सुरु केले. त्यानंतर करणने तिच्यावर बलात्कार केला. त्याचवेळी आणखी एक त्याचा साथीदार सेबेस्टिनने हा व्हिडिओ बनवला. जेव्हा सेबेस्टियनने सुद्धा या मुलीला सेक्ससाठी दवाब आणला तेव्हा मुलीने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी व्हिडिओ व फोटोज आपल्या फोनमधून काढून टाकले आहेत. मात्र तरीही त्यांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.
बातम्या आणखी आहेत...