आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनाढ्य जीएसबी गणपती मंडळाचा 300 कोटींचा विमा; भक्तांचेही संरक्षण |

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील सर्वात धनाढ्य समजल्या जाणाऱ्या जीएसबी सेवा (गौड सारस्वत ब्राह्मण) गणेश मंडळाने यंदाही आपली परंपरा कायम राखत श्री गणेशमूर्ती मंडप इतर साहित्याचा तब्बल ३०० कोटींचा िवमा उतरवला आहे.

जीएसबी मंडळाच्या गणेश मूर्तीमध्ये ६८ किलो सोने आणि ३२७ किलाे चांदी आहे. तसेच मंडप तयार करण्यासाठी ३१५ किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मंडपासाठी २९८ किलाे चांदीचा वापर करण्यात आला होता. मंडळाने या वर्षी मूर्तीचे हात, पाय आणि कान सोन्याचे बनवले आहेत. गणपतीची उंची १४.५ फूट असून मूर्ती इको-फ्रेंडली आहे. मंडपाची सजावट ही यंदा ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ आणि स्वच्छ भारत अभियान संकल्पनेवर आधारित आहे. मंडप अतिशय कल्पकतेने सजवण्यात आला आहे, अशी माहिती जीएसबी गणेश मंडळाचे प्रवक्ते सतीश नायक यांनी दिली.

गेल्यावर्षी मुख्यमंत्री निधीला दिले पाच लाख : गणेशोत्सवाच्याकाळात दर्शनासाठी येणारे भाविक कोट्यवधी रुपये दान करतात. गेल्या वर्षी दररोज सुमारे दीड लाख भाविकांनी जीएसबी गणपतीचे दर्शन घेतले. भाविकांकडून मिळणाऱ्या दानाचा उपयोग वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी करण्यात येतो. यात शिक्षण, आरोग्य आणि वैयक्तिक रूपातही मदत करण्यात येते. गेल्या वर्षी मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला लाख रुपये देणगी स्वरूपात दिले होते.

असे आहे विमाकवच
>सजावटीसाठी वापरलेली चांदी चोरी झाल्यास २५ कोटी.
>भूकंप किंवा आग लागल्यास दहा कोटी.
>मंडळाचे कार्यकर्ते, भक्तांच्या सुरक्षेसाठी २२५ कोटी.
>इतर कारणांसाठी ४० कोटी.
>लालबाग’ला ५१ काेटी विमा
>वडाळायेथील राम मंदिर मंडळ १०५ कोटी रुपये.
>अंधेरीचा राजा मंडळाचा कोटी लाख रुपयांचा विमा.
>लालबागचा राजा मंडळाने १३.२ लाखांचा प्रीमियम भरून ५१ कोटी रुपयांचा विमा उतरवला.
बातम्या आणखी आहेत...