आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणामुळे 8 वर्षे घरात कैद करून घेतले या महिलेने, 300 किलो होते वजन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिता रजनी आई ममतासोबत... - Divya Marathi
अमिता रजनी आई ममतासोबत...
मुंबई- अनुवांशिक लठ्ठपणामुळे आपल्या काका व भावाला गमावलेली मुंबईतील अमिताही याच समस्येमुळे त्रस्त आहे. जेनिटिक कारणास्तव अमिता रजनीचे वजन 300 किलोपर्यंत पोहचले होते. त्यामुळे बेडवर झोपून राहण्याशिवाय तिला पर्याय नव्हता.
117 किलोपर्यंत कमी केले वजन-
2007 पासून बेडवर पडून राहिलेली 42 वर्षाची अमिता रजनी आता चालू-फिरू शकते. मुंबईत राहणारी ही महिला 8 वर्षानंतर आपल्या रूममधून बाहेर पडली.
लहानपणी कमी होते वजन-
अमिताचे लहानपणी वजन जास्त नव्हते. अमिताचा जन्म झाला तेव्हा ती फक्त 3 किलोची होती. अमिता म्हणते, मी जेव्हा 6 वर्षाची झाली तेव्हापासून माझे वजन वाढू लागले. दहावीत असताना तिचे वजन 128 किलोपर्यंत पोहचले होते.
अनुवांशिक समस्या आहे अमिताच्या कुटुंबात-
अमिताची आई ममता या लठ्ठपणाला आनुवांशिक मानते. त्यांचे म्हणणे आहे की, अमिताची आजी 250 किलो वजनाची होती. अमिताचे वडील अविनाश यांनी 40 वर्षापूर्वी सर्जरी केली होती. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वजन 95 किलो होते.
डॉ. रवीन थाट्टे यांच्या म्हणण्यानुसार-
प्लास्टिक सर्जन डॉ. रवीन थाट्टे यांच्या माहितीनुसार, लठ्ठपणाला लाईफ स्टाईलशी जोडता येत नाही. अनेकदा लोक लठ्ठपणाला दैनंदिन कामाशी व जीवनशैली जोडतात. मात्र, त्यात फारसे तथ्य नाही.
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून पाहा, अमिताचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...