आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 32 Crores Aid Fund Distributed To Flood Affectd People Kadam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील पूरग्रस्तांना 32 कोटींचा मदतनिधी वितरित, पतंगराव कदम यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील पूरग्रस्तांना आतापर्यंत 32 कोटींचा मदतनिधी वितरित केल्याची माहिती वने, मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली. पूरग्रस्त भागातील पाणी ओसरल्यानंतर तेथील परिस्थितीची पाहणी करून नियमानुसार मदत दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सागितले.


जून ते 4 ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीत बळी पडलेल्या नागरिकांची संख्या 302 इतकी आहे. तर 1,498 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. 5,040 घरांचे पूर्णपणे, तर 60,962 घरांचे अंशत: नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे अंदाजे 367 कोटी 49 लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतजमीन व पिकांच्या नुकसानीचा पंचनामे 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून अंतिम सर्वेक्षण 15 ऑगस्टपर्यंत कृषी विभागाकडे सादर करावे, असे निर्देश डॉ. कदम यांनी यावेळी दिले.


चा-यासाठी 1.32 कोटी
राज्याचा बहुतांश भागात अतिवृष्टी तर काही भागात पाणीटंचाईची परिस्थिती आहे. पाणीटंचाई असलेल्या क्षेत्रात 822 गावे व 4496 वाड्यांमध्ये अद्यापही 1,078 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत 253 चारा छावण्या आहेत. त्यामुळे चारा वितरणासाठी 1 कोटी 32 लाख 50 हजारांचा निधी देण्यात आला.आल्याचेही कदम यांनी सांगितले.


मराठवाड्याचा पाणीसाठा मागील वर्षी एवढाच
सर्वत्र झालेल्या पावसामुळे राज्याच्या बहुतांश विभागांतील जलाशयांमधील पाण्याची पातळी मागल्या वर्षीच्या तुलनेहून अधिक असली, तरी मराठवाड्याच्या पाणीसाठ्याबाबत मात्र परिस्थिती जैसे थेच आहे. तसेच, इतर विभागांच्या तुलनेत येथील जलाशयांमध्ये अतिशय कमी पाणीसाठा आहे. सध्या मराठवाड्यातील जलाशयांमध्ये 8 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीही तितकेच पाणी जलाशयांमध्ये साठले होते. कोकण विभागातील पाणीसाठा 83 टक्क््यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी हेच प्रमाण 69 टक्के होते. नागपूर विभागात यंदा 84 टक्के, तर मागील वर्षी 38 टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात हे प्रमाण 75 टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा 35 टक्क्यांनी वाढला आहे. नाशिक विभागात सध्या 45 टक्के, तर मागील वर्षी 26 टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागातील धरणे 81 टक्के भरली आहेत. मागील वर्षी हे प्रमाण 45 टक्के होते. एकूण महाराष्ट्रात सध्याच्या पाणीसाठ्याचे प्रमाण 68 टक्के आहे. तर मागील वर्षी हे प्रमाण 38 टक्के इतके होते.