आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी आतापर्यंत 32 लाख शेतकऱ्यांची नोंदणी, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रकिया सुरू असून २६ ऑगस्टपर्यंत ३२ लाख ८ हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली. त्यात २६ लाख ७२  हजार ८५७ शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.  

देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यामध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यात येत आहेत. यात आपले सरकार केंद्र, नागरी सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील केंद्रांचा समावेश आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत १२ सप्टेंबर आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याचे देशमुख यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...