आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 34 Bogus Companies Of Irrigation Minister Tatkare, Company Ministry Issued Notice

जलसंपदा मंत्री तटकरे यांच्या 34 कंपन्या बोगस,कंपनी मंत्रालयाकडून मिळाली नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील बोगस नावाने नोंद झालेल्या त्या 34 कंपन्या या जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या मालकीच्या असून केंद्राच्या कंपनी कार्य मंत्रालयाने या सर्व कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कंपनीचे मालक आणि संचालकांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली.
सोमय्या यांनीच सुनील तटकरेंसह सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या निनावी, बोगस होस्ट कंपन्यांच्या माध्यमातून केलेल्या अफरातफरीबाबत राज्य व केंद्रातील विविध कार्यालयांना अनेक तक्रारी केल्या होत्या. तक्रारीत त्यांनी अशा 105 वादग्रस्त कंपन्यांची यादीच सादर केली होती. ज्या कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल केलेली आहे, मात्र प्रत्यक्षात यातील काही कंपन्या अस्तित्वातच नसल्याचे कंपनी कार्य मंत्रालयाने केलेल्या त्रिस्तरीय चौकशीत उघड झाले आहे.
मंत्र्यांच्या बोगस कंपन्यांविरोधात तक्रार करूनही तब्बल 19 महिने लोटले होते. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. कंपनी कार्यालयाने कंपन्यांना नोटीस बजावल्यामुळे सोमय्या यांच्या आरोपांना बळकटी आली आहे. तटकरेंच्या 34 कंपन्यांमध्ये त्यांचे माळी केशव सारंगे यांचा मुलगा किरण सारंगे यांच्या नावाने 9 कंपन्या तर आहेतच, पण 100 एकर जमीनही आहे. याशिवाय मुंबई येथील तटकरे यांच्या खासगी कार्यालयात लिपिकपदी काम करणार्‍या नम्रता मेगले तसेच येथील शिपाई व वाहन चालक असलेला मनोज शिंदे, तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे, मुलगी अदिती तटकरे, तसेच सून वेदांती तटकरे यांच्या नावाने या कंपन्या असल्याचे चौकशीत उघड झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले.