आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टिंग ऑपरेशनच्या जाळ्यात मुंबई पोलिस, 35 लाचखोर पोलिस सस्पेंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्टिंग ऑपरेशनद्वारे एका 20 वर्षीय तरुणाने बुधवारी अनधिकृत बांधकामातील लाचखोरी उघडकीस आणली. त्याने स्वत: 9 मार्च रोजी अवैध बांधकाम सुरू केले. यासाठी 95 पोलिसांनी 300 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत लाच मागितली. यातील 35 जणांना निलंबित करण्यात आले आहे. स्टिंगच्या 25 व्हीसीडी त्याने लोकायुक्तांकडे सुपूर्द केल्या. पोलिस आपल्यासोबतच वरिष्ठांचाही वाटा मागत होते.

तरुणाने 9 मार्च रोजी मुंबईत बेकायदा बांधकाम सुरू केले होते. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता पोलिस दाखल झाले आणि लाचखोरीचे सत्र सुरू झाले. हुद्दय़ानुसार किंमत ठरत होती. तीनशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत. 18 दिवस चाललेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नेहरूनगर ठाण्याचे कर्मचारी कॅमेर्‍यात अडकले.

व्हिडिओमध्ये जे पोलिस पैसे घेताना दिसत आहेत त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत. वरिष्ठांनी या प्रकरणाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष्य केले की, अधिकारी कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडले याची चौकशी करण्यात येईल. या संपूर्ण लाचखोरीचे सात दिवसांत चौकशी करून जे यात दोषी अढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहे.