आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 37 Senior IPS Officers Transferred For New Assignments In Major Re shuffle

37 IPS अधिकार्‍यांच्या बदल्या, हिमांशू रॉय यांची उचलबांगडी, पुणे आयुक्तपदी पाठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील बड्या 37 पोलिस अधिका-यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. जे पोलिस अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत अशा अधिका-यांनी तेथील काम व आचारसंहिता संपल्यानंतर नव्या ठिकाणी रूजू व्हावे असे म्हटले आहे तर, सध्या पोलिस जे अधिकारी निवडणुक व तत्सम कामात नाहीत त्यांनी तत्काळ नव्या ठिकाणी सूत्रे हाती घ्यावीत असे सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त सतीशचंद्र माथूर हे राज्याचे नवे पोलिस महासंचालक असतील. नागपूरचे पोलिस आयुक्त के के पाठक यांची पुण्याच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर एस पी यादव यांच्याकडे नागपूर आयुक्तपदाची सूत्रे दिली आहेत. विवेक फणसाळकर यांच्याकडे एटीएसचे प्रमुखपद देण्यात आले आहे.
खाली वाचा, पोलिस अधिका-यांचे नाव व त्यांना कोणत्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली आहे ते...( प्रथम नाव, कंसात सध्याचे पोस्टिंग व त्यापुढे मिळालेली नवी नियुक्ती)

1) सतीशचंद्र माथूर (पोलिस आयुक्त पुणे)- महासंचालक, कायदे आणि तंत्रज्ञान, मुंबई (पदोन्नती)
2) एस. पी. यादव (अति. महासंचालक, CID) - पोलिस आयुक्त, नागपूर
3) के. के. पाठक (पोलिस आयुक्त, नागपूर) - पोलिस आयुक्त, पुणे
4) व्ही. डी. मिश्रा (अति. महासंचालक, PCR) - अति. महासंचालक (आस्थापना)
5) डी. कणकरत्नम (अति. महासंचालक, आस्थापना) - अति. महासंचालक (रेल्वे)
6) संजय बर्वे (अति. महासंचालक (रेल्वे) - अति. महासंचालक (ACB विभाग)
7) संदीप बिश्नोई (मुख्य दक्षता अधिकारी, एसटी) - अति. महासंचालक, SRPF (पदोन्नती)
8) विनित अग्रवाल (विशेष गृहसचिव) - मुख्य दक्षता अधिकारी, एसटी
9) विवेक फणसळकर (सहआयुक्त, प्रशासन) - एटीएस प्रमुख
10) हिमांशू रॉय (एटीएस प्रमुख) - अति. महासंचालक, पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण
11) बी. के. उपाध्याय (सहआयुक्त, वाहतूक) - विशेष प्रधान गृहसचिव (पदोन्नती)
12) संजय कुमार (सहआयुक्त, पुणे) - अति. महासंचालक, CID (पदोन्नती)
13) राजेंद्र सिंह (पोलिस आयुक्त, औरंगाबाद) - अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय (पदोन्नती)
14) हेमंत नागराळे (अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय) - अति. महासंचालक, म्हाडा
15) प्रज्ञा सरवदे (विशेष पो. महानिरीक्षक, दक्षता अधिकारी, सिडको)- अति.महासंचालक, सिडको (पदोन्नती)
16) विठ्ठल जाधव (प्रशासकीय संचालक) - तुरुंग महानिरीक्षक, नागपूर
17) शशिकांत शिंदे (तुरुंग महानिरीक्षक, नागपूर) - संचालक, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ
18) मधूकर पांडे (विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण) - पोलिस आयुक्त, रेल्वे
19) रविंद्र सिंघल (पोलिस आयुक्त, रेल्वे) - विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण
20) कुलवंतकुमार सरंगल (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) - विशेष महानिरीक्षक
21. प्रभातकुमार (विशेष महानिरीक्षक) - विशेष महानिरीक्षक, कायदा-व्यवस्था
22) देवेन भारती (विशेष महानिरीक्षक, कायदा आणि सुव्यवस्था) - सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई
23) धनंजय कमलाकर (सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई) - सहआयुक्त, आर्थिक गुन्हे
24) राजवर्धन (अति. पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे) - सहआयुक्त, नागपूर (पदोन्नती)
25) मिलिंद भारंबे (अति. पोलिस आयुक्त) - वाहतूक सहआयुक्त, मुंबई
26) विश्वास नांगरे-पाटील (उपमहानिरीक्षक, ACB) - विशेष महानिरीक्षक (पदोन्नती)
27) सुरेश मेखला (पोलिस आयुक्त, अमरावती) - विशेष महानिरीक्षक, SRPF (पदोन्नती)
28) अनुपकुमार सिंह (सहआयुक्त, नागपूर) - सहआयुक्त, प्रशासन, मुंबई
29) सुनील रामानंद (विशेष महानिरीक्षक, SRPF) - सहआयुक्त, पुणे
30) रितेश कुमार (विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर) - विशेष महानिरीक्षक, सीआयडी, पुणे
31) संजय वर्मा (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) - विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर
32) जयजित सिंह (विशेष महानिरीक्षक, VIP सुरक्षा) - विशेष महानिरीक्षक, नाशिक
33) प्रवीण साळुंखे (विशेष महानिरीक्षक, नाशिक) - विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
34) प्रशांत बुरुडे (विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा) - विशेष महानिरीक्षक, कोकण
35) अमिताभ गुप्ता (विशेष महानिरीक्षक, कोकण) - विशेष महानिरीक्षक, VIP सुरक्षा
36) बिपीनकुमार सिंह (विशेष महानिरीक्षक, तुरुंग) - विशेष महानिरीक्षक, नांदेड
37) दीपक पांडे (अति. आयुक्त नागपूर, गुन्हे) - विशेष महानिरीक्षक, मानवाधिकार आयोग.