आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 38 Year Old Man Suicide Due To His Wife & Her Lover\'s Harrsement

पत्नी व तिच्या प्रियकराच्या असह्य छळाचे रेकॉर्डिंग करून एकाची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पहिल्या पत्नीपासून होणार्‍या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. सुनील उघडे (38) असे त्याचे नाव असून, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाइलवर २0 मिनिटांचे रेकॉर्डिंग करून त्यात पत्नी वारंवार कशी त्रास देत होती याची व्यथा मांडली आहे. पोलिसांनी सुनीलच्या पहिल्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, सुनीलचे पहिले लग्न अनुराधा (36) हिच्यासोबत झाले होते. सुनीलला अनुराधापासून काजल (18), डिंपल (16) आणि यश (13) अशी तीन मुले आहेत. मात्र वर्षभरापूर्वी अनुराधा अचानकपणे घरातून निघून गेली. त्यानंतर तिने तेथीलच परिसरातील अब्दुल शेख (38) या व्यक्तीसोबत विवाह केल्याचे पुढे आले. त्यामुळे सुनीलची परिसरात मोठी बदनामी झाली. त्यामुळे तो मानसिकरित्या पूर्णपणे खचला होता तसेच तो तणावातही होता. अशा परिस्थितीतही मुलांची व आपली देखभाल करण्यासाठी नुकतेच लग्न केले होते.
पुढे अनुराधाने काय केले, वाचा पुढे...