आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3rd Front In Maharashtra, Sharad Pawar nitin Gadkari May Back Him?

\'मनसे\'च्या संभाव्य तिस-या आघाडीमागे गडकरी-पवार? सेनेला \'दे धक्का\'साठी खेळी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठीची रणनिती महाराष्ट्रात दिवसेंदिवस बदलत चालली आहे. शहरी तोंडावळा असलेल्या आम आदमी पक्षामुळे महाराष्ट्रात मनसेच्या इंजिनाचा वेग मंदावणार असल्याची कुणकुण लागल्याने लोकसभेची निवडणूक लढवावी की नाही या संम्रभावस्थेत राज ठाकरे असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी मनसेच्या इंजिनाला नितीन गडकरी आणि शरद पवारांनी कोल्हापूर पट्ट्यात जनसुराज्य पक्ष व रायगड पट्ट्यात शेकापचा डब्बा जोडून शिवसेनेला अडचणीत आणण्याची खेळी पडद्यामागे केल्याची शक्यता आहे. याचबरोबर डावे पक्षही या आघाडीत सामील करून सेनेला धोबीपछाड देता येईल, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मावळ मतदारसंघात मनसेने शेकापबरोबर युती केल्यास येथून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्याचा मार्ग सुकर होत आहे. तसेच कोल्हापूर व हातकणंगले या दोन मतदारसंघात जनसुराज्य व डावे पक्ष मनसेसोबत जोडून दिल्यास सेनेच्या तिकीटावर उभे राहिलेले संजय मंडिलक आणि राजू शेट्टींचा पाडाव करणे शक्य आहे. त्यामुळे या तिस-या आघाडीमागे शरद पवार यांनी व्हाया नितीन गडकरींकडून राज ठाकरेंकडे साकडे घातले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एका महायुतीतील नेत्याने सांगितले. मनसेसोबत शेकाप, जनसुराज्य व डावे पक्षाची आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या मावळ, कोल्हापूर, हातकणंगले या तीन जागा सेफ होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. असे झाल्यास आगामी काळात महाराष्ट्रात नव्या राजकारणाची नांदी होऊ शकते.
राज ठाकरे शिवसेनेचे जेवढे खच्चीकरण करतील तेवढा त्यांच्या मनसे पक्षाच्या वाढीस उपयुक्त ठरणार आहे. त्यातच राज-गडकरी यांची मैत्री असल्याने व गडकरी-मुंडे यांचे वर्चस्ववादाच्या लढाईत मुंडे सेनेकडे तर गडकरी मनसेकडे असल्याचे महाराष्ट्राला दिसून आले आहे. त्यामुळे सेनेला गडकरी चालत नाहीत तर मनसेला किंवा राज यांना मुंडे चालत नाहीत. नितीन गडकरींचे शरद पवारांशीही मैत्रीपूर्ण संबंध आता लपून राहिले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जागा वाढविण्यासाठी संभाव्य अडचणी लक्षात घेऊन पवारांनी गडकरींच्या मार्फत राज यांच्याकडे तिस-या आघाडीबाबत चर्चा केली असण्याची शक्यता असू शकते.
काय गणित आहे मावळ, कोल्हापूर आणि हातकणगंलेचे....
तिस-या आघाडीमागे पवार-गडकरी ही का संभवते शक्यता, वाचा पुढे...