आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार हजार 606 कोटींच्या पुरवणी मागण्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने विविध विभागांच्या सुमारे 4 हजार 606 कोटींच्या पुरवणी मागण्यांची यादी सादर केली. यामध्ये महसूल लेखांवरील खर्चाच्या 4 हजार 265 कोटींच्या मागण्या तर भांडवली खर्चाच्या लेख्यांवरील मागण्यांचा खर्च 341 कोटी रुपये मांडण्यात आला आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 122 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची यादी सादर करण्यात आली आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीसाठी 1 कोटी 30 लाख रुपये, तर विमान दुरुस्तीसाठी आकस्मिक निधीतून 1 कोटी 2 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याने याबाबतची पुरवणी मागणी मांडण्यात आली आहे. नवीन वाहने आणि लोकराज्य मुद्रणासाठी 2 कोटी 79 लाख रुपये, मिहान प्रकल्पासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आली आहे.
हेलिकॉप्टरसाठी 2 कोटी- गृहविभागामार्फत करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी 2 कोटी,गणवेश खरेदीसाठी 21 कोटी 24 लाख आणि जिल्हा पोलिस दलासाठी 143 कोटीे, शस्त्रसाठा आणि दारूगोळा खरेदी साठी 22 कोटी तर तंटामुक्त गाव योजनेसाठी 29 कोटी 47 लाखांच्या मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. मुंबई किनारा सुरक्षा योजनेसाठी 750 कोटी रुपयांपैकी शासन, सिडको आणि एमएमआरडीएने प्रत्येकी 250 कोटी रुपये हिस्सा द्यावयाचा आहे, त्या रक्कमेच्या इसारपोटी 5 कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागामार्फत दुष्काळ निवारणातील चाºयासाठी 50 कोटी रुपये, टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्यासाठी 50 कोटी रुपयांची तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 582 कोटी रुपयांच्या मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. कुंभ मेळ्यासाठी नाशिक महापालिकेला 5 कोटी रुपये देण्याबाबत आणि जकातीच्या पुन:स्थापनेसाठी महापालिकांना मदत म्हणून 45 कोटी 85 लाख रुपये तर नैसर्गिक आपत्तीतील सोयाबीन, भात आणि कापूस पिकासाठी 400 कोटींची तरतूद करण्याची मागणी सादर करण्यात आली आहे. आगीनंतर मंत्रालय नूतनीकरणासाठी 50 कोटी रुपये तर इतरत्र हलवण्यात आलेल्या कार्यालयांच्या भाड्यासाठी 30 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.