आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराध्याला हृदय देणाऱ्या 14 महिन्यांचा चिमुकल्यामुळे मिळाले दोघांना नवे आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबईतील 4 वर्षांच्या आराध्या मुळेला सुरतमधील 14 महिन्यांचा सोमनाथ शाह या चिमुकल्यामुळे नवे आयुष्य मिळाले आहे. त्याच्या हृदयाने आराध्याला नवे आयुष्य दिले. सोमनाथच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमनाथ या जगातून जाताना दोन जणांना नवे आयुष्य देऊन गेला.
 
गेल्या दीड वर्षांपासून हृदयाच्या शोधात असलेल्या आराध्या मुळेवर अखेर यशस्वीरित्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. आराध्याला एप्रिल 2016 ला अचानक त्रास होऊ लागला होता. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आराध्याचे हृदय फक्त 10 टक्के काम करत होते, असे आढळून आले होते. त्यामुळे तिच्यावर हृदय प्रत्यारोपण हा एकच पर्याय होता.
 
14 महिन्यांच्या सोमनाथचा मृत्यू
घरात खेळताना सोमनाथ 2 सप्टेंबर रोजी  शिडीहून कोसळला आणि डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याला 4 सप्टेंबर रोजी ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाने ‘डोनेट लाईफ’ या एनजीओशी संपर्क साधला. एनजीओकडून सोमनाथच्या आई-वडिलांना अवयवदान करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. आम्ही मुलगा तर गमावला. मात्र तो आराध्याच्या रुपाने अजूनही जिवंत आहे. सोमनाथच्या अंत्यसंस्कारानंतर आराध्याला भेटण्यासाठी मुंबईला जाऊ, असे सोमनाथच्या आई-वडिलांनी म्हटले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...