आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलीकर, मोहिते-पाटील, संजय घाटगे शिवसेनेत, राष्ट्रवादीला भगदाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: प्रताप पाटील-चिखलीकर)
मुंबई- नांदेड जिल्ह्यातील लोहा- कंधार मतदारसंघाचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील-चिखलीकर, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विक्रांत मोरे, सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह आज शिवसेनेत प्रवेश केला. 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधारी आघाडीवर जनतेचा रोष असल्याने या पक्षातील आणखी काही नेते येत्या आठवड्याभरात भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन मंत्री शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे पक्षाचे नेते दिवाकर रावते यांनी दावा केला आहे.
नांदेडमधील शिवसेना कार्यकर्त्यांचा चिखलीकर यांच्या पक्षप्रवेशास कुठलाही विरोध नसल्याने त्यांना सेनेत प्रवेश देण्यात येत असल्याचे सेनेने म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नेते व माजी आमदार संजय घाटगे शिवसेनेत गुरुवारी प्रवेश करणार आहेत. गुरुवारी उद्धव ठाकरे कोल्हापूर दौ-यावर आहेत. त्यावेळी ते पक्षप्रवेश करतील. संजय घाटगे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. कागल विधानसभा मतदारसंघात त्यांनी तयारी सुरु केली आहे. तेथून त्यांना शिवसेना तिकीट देऊ शकते. संजय घाटगे हे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मानले जातात. लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्यासाठी घाटगे यांनी मेहनत घेतली होती. मात्र, तरीही मंडलिक यांचा पराभव झाला होता.
दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील बडे राजकीय घराण्यात फूट पडल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभेवेळी दिसून आले होते. राष्ट्रवादीचे बडे नेते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याविरोधात लोकसभेला त्यांचे बंधू प्रतापसिंह यांनी निवडणूक लढविली होती. त्यात प्रतापसिंह यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मात्र, मोहिते-पाटील घरांत राजकीय वर्चस्वातून वाद सुरु आहेत. त्यामुळेच आधी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असा प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी राजकीय प्रवास केला. आता त्यांचे पुत्र शिवसेनेत प्रवेश करून पक्ष प्रवेशाचे वर्तुळ पूर्ण केले आहे.