आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारीरिक संबंधांना नकार दिल्यामुळे 45 वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या 4 जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेचा खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. - Divya Marathi
महिलेचा खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई- आरे कॉलनी भागात आढळलेल्या 45 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. शारीरिक संबंधांना नकार दिल्यामुळे सत्येंद्रसिंह नावाच्या एका 25 वर्षीय सुरक्षारक्षकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने घरकाम करणाऱ्या या महिलेचा खून केला आहे.
 
गोरेगावमधील आरे कॉलनीतील झुडपांमध्ये सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पतीच्या निधनानंतर संबंधित महिला परिसरात एका ऑफिसमध्ये काम करायची. तिच्या डोक्यावर आणि पाठीवर वार केल्याच्या खुणा होत्या. तिच्या मुलाने आपल्या आईचा मृतदेह ओळखला तसेच आईला एका सुरक्षारक्षक त्रास देत होता याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी या सुरक्षारक्षकाकडे चौकशी केली असता त्याने ती पाय घसरुन पडल्याचे सांगितले. पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या 3 मित्रांच्या सहाय्याने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सुरक्षारक्षकाला आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये या महिलेवर लैंगिक अत्याचार झाले की नाही, हे स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...