आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Women Died In Rail Accident Near Mumbai At Aasangaon

धक्कादायक: आसनगावाजवळ 4 महिलांना गोदान एक्स्प्रेसने चिरडले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईजवळील आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी अडीचच्या सुमारास गोदान एक्स्प्रेसने 4 महिलांना चिरडले. यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वे रूळावर चारही महिलांच्या शरीराचे तुकडे विखुरलेले होते. मृतात एका 18 वर्षीय तरूणीचा समावेश आहे तर उर्वरित तीन वयस्कर महिला आहेत.
संबंधित महिला रेल्वे मार्गावरून चालत चालल्या होत्या. त्याचवेळी अत्यंत वेगाने येणा-या गोदान छापरा एक्स्प्रेसने जोरात धडक दिली. यात चारही महिला चिरडल्या गेल्या. आसनगाव हे रेल्वे स्टेशन ठाणे जिल्ह्यात येते तर हे रेल्वे स्टेशन मुंबई उपनगरी रेल्वेतंर्गत मध्य रेल्वेमध्ये मोडते.