आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Year School Girl Raped By School Bus Conductor In Mumbai

स्‍कूलबसमध्‍ये चिमुकलीवर बलात्‍कार नव्‍हे छेडछाड, पोलिसांचे स्‍पष्‍टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्‍ली- मुंबईत चिमुकलीवर धावत्‍या स्‍कूलबसमध्‍ये बलात्‍कार झाल्‍याच्‍या घटनेने खळबळ उडाली होती. परंतु, तिच्‍यावर बलात्‍कार झालेला नसल्‍याचे आज पोलिस आयुक्त सत्‍यपाल सिंह यांनी स्‍पष्‍ट केले. तिच्‍या बलात्‍कार झाला नाही तर वाहकाने छेडछाड केली, असे स्‍पष्‍टीकरण आयुक्तांनी दिले.

एका चार वर्षांच्‍या चिमुकलीवर स्‍कूलबसमध्‍येच बसच्‍या वाहकाने बलात्‍कार केल्‍याची माहिती सर्वप्रथम उघडकीस आली होती. ही चिमुकली एका नामांकित शाळेत नर्सरीत शिकते. तिला घरी सोडताना हा प्रकार घडला.

पोलिसांनी रमेश राजपूत या वाहकाला अटक केली आहे. तो विलेपार्ले येथील रहिवासी आहे. प्राप्‍त माहितीनुसार, बसमधून विद्यार्थ्‍यांनी घरी सोडण्‍यात येत होते, त्‍यावेळी ही घटना घडली. पीडित मुलीचे घर सर्वात शेवटी येते. त्‍यामुळे ती बसमध्‍ये एकटीच होती, तेव्‍हा राजपूतने डाव साधला.

स्‍कूलबसच्‍या नियमांनुसार, स्‍कूलबसमध्‍ये महिला कर्मचारी असणे आवश्‍यक आहे. परंतु, या बसमध्‍ये महिला कर्मचारी नव्‍हती, असे पोलिसांचे म्‍हणणे आहे. तर शाळा प्रशासनाने पोलिसांचा दावा फेटाळला आहे. शाळेच्‍या माहितीनुसार, महिला कर्मचारी बसमध्‍ये उपस्थित होती. तिने विरोध केला होता. परंतु, राजपूतने तिला जुमानले नाही. बस चालकाने याप्रकरणी साक्ष दिली आहे. परंतु, बस चालवित असताना त्‍याला वाहकाचे कृत्‍य समजले नाही. याप्रकरणी वाहकाला 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत.