मुंबई - मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनला 30 जुलै रोजी नागपूर कारागृहात फासावर लटवले जाणार आहे. पण, याकूबला फाशी देऊ नका, अशा मागणीचे निवेदन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील 40 सेलिब्रिटींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आज (रविवार) दिले आहे. यामध्ये भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी, माकप खासदार सीताराम येचुरी, चित्रपट निर्माते महेश भट्ट, अभिनेता नसिरुद्दीन शाह, माकप नेत्या वृंदा करात यांच्या एका निवृत्त न्यायाधिशांचाही समावेश आहे.
देशस्वातंत्रानंतर केवळ 170 गुन्हेगारांना फाशी
दुसरीकडे भाजपच्या बहुतांश नेत्यांनी याकूबच्या फाशीचे समर्थन केले आहे. यात पक्षाचे प्रवक्ता संबित पात्रा, सुब्रमण्यम स्वामी आणि आमदार किरीट सोमैया यांचाही समावेश आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, याकूबला फासी व्हायलाच हवी; कारण 1947 नंतर देशात 170 गुन्हेगारांना मृत्यूदंड दिला गेला. त्यात केवळ 15 मुस्लिम आहेत. आमदार किरीट सोमैया यांनी सलमान याच्या ट्वीट बद्दल आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, सोमवारी अधिवेशात हा मुद्दा चर्चेत आणणार आहो. शिवाय, वकील उज्ज्वल निकम म्हणाले, याकूबने जरी शरणागती पत्कारली असली तरीही त्यामुळे त्याने केलेला गुन्हा झाकला जाणार नाही, असे ते म्हणाले.
ही तर गंभीर बाब
ज्या व्यक्तीने शांत डोक्याने शेकडाे निष्पाप लोकांचा जीव घेतला त्याची फाशी माफ करण्याची मागणी गंभीर आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर भारतातर्फे चुकीचा संदेश जात आहे, असे मत भाजप नेत्या शायना एन.सी. यांनी व्यक्त केले.