आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 40 आयपीएसच्या बदल्या, अनिल कुंभारे औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गृहमंत्रालयाने शनिवारी राज्य पोलिस दलात कार्यरत पोलिस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या 40 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षकपदी ठाणे शहरचे उपायुक्त अनिल कुंभारे आले आहेत. सध्याचे पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांची नागपूरच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. औरंगाबाद एसीबीचे उपायुक्त एस.डी. बाविस्कर यांची सिंधुदुर्ग अधीक्षकपदी बढती झाली. औरंगाबाद शहरचे उपायुक्त डॉ. जय जाधव पुण्याच्या राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी गेले आहेत.

अधिकार्‍याचे नाव नवीन नियुक्ती
एस.डी. बाविस्कर पो. अधीक्षक, सिंधुदुर्ग
पी. आर. बुधवंत पो. उपायुक्त, ठाणे शहर
एन. अंबिका पो. अधीक्षक, हिंगोली
अभिषेक त्रिमुखे पो. अधीक्षक, उस्मानाबाद
ज्ञानेश्वर चव्हाण पो. अधीक्षक, लातूर
ए.बी. रोकडे पो. अधीक्षक परभणी