आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ जिल्ह्यात चारशे कुमारीमाता !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील महिला, मुलींची स्थिती किती गंभीर आहे त्याचे हृदयद्रावक प्रकरण पुढे आले असून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजनांची जंत्री फेकणारे सरकार कसे डोळ्यावर कातडे ओढून बसलेले असल्याचेच यातून दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मुलींवर परप्रांतिय ठेकेदारांनी लैंगिक अत्याचार केल्यामुळे 400 पेक्षा जास्त मुली कुमारीमाता झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत 2003 मध्ये तक्रार दाखल करूनही आजवर या ठेकेदारांना शिक्षा झालेली नाही आणि राज्य सरकारही त्यांना शिक्षा व्हावी यासाठी गंभीरतेने प्रयत्न करत नसल्याचेच दिसून येत आहे.

ठेकेदारांवर कोणती कारवाई केली असा प्रश्न अँड उत्तमराव ढिकले, दिनानाथ पडोळे, विरेंद्र जगताप, सुभाष धोटे, प्रशांत ठाकूर, अमिन पटेल, विजय वड्डेटीवार, नितीन भोसले, विवेकानंद पाटील आणि धैर्यशील पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता.

केंद्राच्या दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अँट्रॉसिटी) तरतुदीनुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समितीची फेब्रुवारीत बैठक झाली. या बैठकीत आदिवासी विकास मंत्री अणि अदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मुलींवर परराज्यातील ठेकेदारांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचे मान्य करत जिल्ह्यात 400 पेक्षा जास्त मुली कुमारीमाता झाल्याचे निदर्शनास आणले. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचारामुळे तब्बल 400 हून अधिक मुली कुमारीमाता झाल्याचे मान्य केले. तसेच याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

सरकारचे उदासीन धोरण
तिसरे प्रकरण 6 मार्च 2014 ला उघडकीस आले असून या वेळी मात्र अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आल्याचेही गृहमंत्र्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे. मात्र, 2003 पासून न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांतमध्ये आरोपींना शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने काय पावले उचलली याची माहिती मात्र गृहमंत्र्यांनी आपल्या उत्तरात दिलेली नाही.

खटला न्यायप्रविष्ट
कुमारी मातांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना त्याच दिवशी अटक केली. या गुन्ह्यात तपास पूर्ण करण्यात अला असून न्यायालयात दोषारोप ठेवण्यात आले. मात्र, हा खटला अजूनही न्यायप्रविष्ट असल्याचेही उत्तरात म्हटले आहे. तसेच 2012 मध्येही गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत न्यायालयात दोषारोप ठेवण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.