आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

41 PHOTOS मध्ये पाहा, काळानुरूप बदललेल्या स्वप्ननगरी मुंबईचे रुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेदरकार गाडी चालवून पाच जणांचा बळी घेतल्याने सलमान खानला HIT AND RUN केसमध्ये पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. सलमान बॉलिवूडमधील एक मोठा सेलिब्रिटी स्टार आहे. त्यामुळे या निर्णयाचा बॉलिवूडला फार मोठा फटका बसू शकतो. मुंबईत असलेल्या बॉलिवूडमध्ये सलमानने आपल्या करिअरची सुरूवात बीबी हो तो ऐसी या चित्रपटातून केली. मात्र त्याला खरी ओळख मात्र सुरेश बडजात्या यांच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर अनेक हिट चित्रपट देत सलमान बॉलिवूडमधील सुपरस्टार बनला. मुंबईमधील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेल्या सलमानला मुंबईनेच लहानाचे मोठे केले. या मुंबईने सलमानच्या आनंदाचे क्षणसुध्दा पाहिले आणि दुःखाचे दिवसही सलमानला दाखवले. अगदी मिनिटा मिनिटाला बदलणार्‍या या मुंबईने अनेकांना घडवले आणि अनेकांना बिघडवलेसुध्दा. स्वप्नाची नगरी असलेली ही मुंबई ब्रिटीशांच्या काळात कशी होती आणि आता वेळेनुसार अनेक बदल होत आज याच मुंबईचा जगातील महत्त्वांच्या शहरांमध्ये समावेश होत आहे. तीच्या याच सर्व प्रवासाचे काही खास दुर्मिळ फोटो आम्ही आणले आहेत खास तुमच्यासाठी. या फोटोंमधून तुम्हाला मुंबईचे जुने रुप आणि आजचे रुप दिसून येईल.
पुढील स्लाईडवर पाहा, मुंबईच्या इतर ठिकाणांचे पुर्वीचे आणि आताचे फोटोज...