आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्युटीला दांडी मारणारे 41 पोलिस निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गणेशोत्सवात विनापरवानगी सुटी घेणा-या 41 पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. कायम बेजबाबदारपणे वागणा-या पोलिसांना सज्जड इशारा देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) हेमंत नागराळे यांनी दिली.


गणेशोत्सवात मुंबई शहरावर अतिरेकी हल्ले होऊ शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क होती. तरीदेखील अनेक पोलिसांनी ही बाब गांभीर्याने न घेता ऐन बंदोबस्तादरम्यान सुटी घेतली. त्यामुळे आपल्या कर्तव्याबाबत निष्काळजी दाखवणा-या पोलिसांना इशारा देण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा पोलिस मुख्यालयात होती. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि त्याखालील पोलिसांचा समावेश आहे.