आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवशी 42 अधिकार्‍यांच्या बदल्या, फडणवीसांनी प्रशासनाचे चक्र पालटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपल्या राजवटीत बरीच वर्षे एकाच खात्यात आपापल्या मर्जीतील सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अशा अधिकार्‍यांना झटका देत एकाच दिवशी तब्बल ४२ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. अजित पवार यांच्या खास मर्जीतील असलेल्या अजय मेहता यांची ऊर्जा विभागातून बदली करण्यात आली आहे. २००५ पासून मिहान निर्मितीचे संचालक असलेले मेहता २००९ मध्ये महावितरणचे संचालक झाले. पाच वर्षे ते याच पदावर होते. शेवटी त्यांची बदली झाली ती सरकार बदलल्यानंतरच. त्यांना पर्यावरणचे अपर मुख्य सचिवपद देण्यात आले.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करून प्रशासनचे चक्र पालटून शासन गतिमान करण्यासाठी युती सरकारने हे पाऊल टाकले आहे. अजित पवारांशिवाय आपण कोणाला उत्तर देण्यास बांधील नाही, असा हुकूमशाही कारभार मेहतांनी चालवला होता. एखाद्या विषयाची माहिती घेण्याविषयी प्रसारमाध्यमांकडून विचारणा केली असता आपण काही सांगण्यास बांधील नसल्याचे त्यांचे उत्तर असायचे. मनुकुमार श्रीवास्तव, नितीन करीर, श्रीकांत सिंह, मेधा गाडगीळ, अश्विनी भिडे, मनीषा म्हैसकर या अधिकार्‍यांच्याही बदल्या झाल्या आहेत. फडणवीस सरकारच्या या धोरणामुळे अनेक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.