आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 427 Million Land Scam In Maharashtra, Sharad Pawar

पुण्यात ४२७ कोटींचा भूखंड घोटाळा, शरद पवारांच्या जावयावर आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे जावई सदानंद सुळे यांच्यावर बालेवाडी येथील रामोशी समाजाच्या आठ लाख ४९ हजार स्केअर फूट भूखंडाच्या हेराफेरीचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकाराचे (आरटीआय) कार्यकर्ते रविंद्र बर्हाटे यांनी हा आरोप केला आहे. त्यांच्यानूसार राज्य सरकारला या भूखंडाच्या हेराफेरीमुळे मुळे ४२७ कोटी ७० लाख ९० हजार रुपयांचा भूर्दंड बसला आहे.
बर्हाटे यांनी आरोप केला की, बालेवाडी प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे या भूखंडावर बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या कंपनीत पवारांचे जावई आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांच्या मालकीच्या प्रेमसागर हॉटेल प्रायव्हेट लिमीटेडची भागिदारी आहे.
बर्हाटे यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे माहितीच्या अधिकारात मागवलेले सर्व कागदपत्र आहेत, ज्यामुळे सिद्ध होते की, भुखंडाचा श्रीखंड लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या प्रकरणात केवळ राज्य सरकारलाच भूर्दंड सोसावा लागलेला नाही तर, न्यायालयाचीही दिशाभूल करण्यात आलेली आहे.
बर्हाटे म्हणाले, ज्या भूखंडावर काम सुरु करण्यात आले आहे, ती जामीन शेतीची आहे. शेतजमीन एनए करण्यासाठी जमीनीच्या ५० टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. त्यासोबतच कमाल जमीन धारणा विभागाचे नाहरकत घेण्यात आलेले नाही. या प्रकरणात नियमांची अक्षरशः पायमल्ली करण्यात आली आहे. त्यांनी बालेवाडी कंपनीला आव्हान दिले आहे की, जमीन खरेदी नियमानुसार झाली असेल तर, कंपनीने कमाल जमीन धारणा कायद्याचे नाहरकत प्रमाणपत्र दाखवावे.
बर्हाटे यांनी आरोप केला की, जेव्हा आम्ही या प्रकरणी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी नकार देत हे दिवाणी प्रकरण असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिका-यांना विनंती करुनही काहीही झाले नाही. शेवटी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ९ तारखेला स्थानिक पोलिसांनी २२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बर्हाटे म्हणाले, पवारांच्या कुटूंबातील आणि अनेक बड्या असामींचे हितसंबंध असल्यामुळे या प्रकरणात कडक कारवाई झालेली नाही.
रामोशी वतन जमीन घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत केली जावी. दोषींविरोधात फौजदारी खटले दाखल करावे आणि राज्य सरकारने ही जमीन तत्काळ ताब्यात घ्यावी अशी मागणी बर्हाटे यांनी केली आहे.
भूखंड माफियांना ‘मोक्का’चा फास!
लष्कर जमीन घोटाळा : सीबीआय वकिलावर ताशेरे
घोटाळ्यावर घोटाळा : राज्यमंत्री देवकर पुन्हा अडचणीत