आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 43 People Died Due To Swine Flue In Maharashtra Last 3 Months

राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 43 बळी, मुंबईत आज 3 जण दगावले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात स्वाईन फ्लूने कहर माजवला असून मागील महिन्याभरात राज्यात स्वाईन फ्लूमुळे 43 जणांचा मृत्यू झाला आहे तर मुंबई आज एका दिवसात 3 जणांचा बळी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.
राज्यासह देशातही स्वाईन फ्लूने कहर घातला आहे. गेल्या 12 दिवसात देशभरात स्वाईन फ्लूने 216 जणांचा बळी गेला आहे. तर जानेवारीपासून 407 लोकांना या रोगामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
दरम्यान, राज्यात पुणे आणि नागपूर शहरात सर्वाधिक रूग्ण आढळून येत आहेत. राज्यातील विविध शहरात हजारो लोक स्वाईन फ्लूने तापाने फणफणले आहेत. मात्र त्यांच्यावर वेळीच व योग्य उपचार होत नसल्याने मृतांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.