आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 47 Years After Death, Capt Harbhajan Singh Guards Border With China 'in Spirit'

शहीद झाल्‍यानंतरही मिळत होती दोन महिने सुटी, पगार; आजही देशसेवेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबांच्‍या मंदिरातील दृश्‍य - Divya Marathi
बाबांच्‍या मंदिरातील दृश्‍य
मुंबई - 1965 च्‍या युद्धात भारत विजयी झाला. त्‍याला आता 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com आपल्‍या वाचकांना एका वीर सैनिकाची रंजक कथा सांगणार आहे. जो की शहीद झालेला आहे. मात्र, आजही 47 वर्षांपासून सीमेवर तैनात आहे. एवढेच नाही तर शहिद झाल्‍यानंतरही अनेक वर्षे त्‍याला गावी जाण्‍यासाठी रीतसर दोन महिन्‍यांची सुटी दिली जात होती. भारत-चीन सीमेवर तैनात सैन्‍य दलातील जवान त्‍याला आजही कॅप्‍टन बाबा हरभजनसिंगच्‍या नावाने आवाज देतात. एवढेच नाही तर चीनच्‍या सैनिकांनी त्‍याला घोड्यावर गस्‍त घालतानाही पाहिलेले आहे.

तुम्‍ही विश्‍वास ठेवा किंवा ठेवूही नका. पण, भारत-चीन सीमेवर कार्यरत असलेल्‍या बहुतांश सैनिकांना विश्‍वास आहे की, कॅप्‍टन बाबा हरभजनसिंग हे शहीद झाल्‍याच्‍या तीन दशकानंतरही सीमेवर देशाची सुरक्षा करत आहेत. आपला काही निरोप द्यायचे असल्‍यास ते कर्मचाऱ्यांच्या स्वप्नात येतात. यामुळेच ते शहीद झाल्‍यानंतर काही वर्षांपर्यंत त्‍यांना रीतसर सुटीसुद्धा दिली जात होती. एवढेच नाही तर त्‍यांना गावी जाण्‍यासाठी प्रथम श्रेणीच्‍या वातानुकूलित बोगीत आरक्षण केले जात असे. विशेष म्‍हणजे त्‍यांचे रिकाम्‍या बर्थवर बाबाचे सामान ठेवले जात असे आणि त्‍यांना गावी पोहोचवण्‍यासाठी दोन सैनिकही सोबत दिले जात असत. दुसरीकडे आता बाबा हे दोन महिने सुटी असल्‍याचे समजून सीमेवर सुरक्षा वाढवली जाई.
पुढील स्‍लाइडवर वाचा स्‍वप्‍नात येऊन सांगितले स्‍वत:च्‍या मृत्‍यूबद्दल
अनेक वर्षे पगार आणि बढतीही दिली
मंदिर बांधले....