आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईहून मुंबईत दाखल झालेल्या तीन जणांकडून 48 लाखांचे सोने जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुबईहून मुंबईत दाखल झालेल्या तीन जणांकडून कस्टम विभागाने 48 लाखांचे सोने शुक्रवारी जप्त केले. उबीद नेलीयाडूकम, अस्मी उस्मान आणि मोहंमद जमीर अशी आरोपींची नावे आहेत. तीन जण दुबईहून सोने घेऊन येत असल्याची माहिती एका खब-याने कस्टमच्या अधिका-यांना दिली होती. त्यानुसार पथकाने विमानतळावर सापळा रचला होता.
विमानतळावर उतरल्यानंतर तिघेही घाईघाईने पुढे जात होते. या वेळी कस्टमच्या अधिका-यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे 48 लाखांचे सोने आढळले. तिघांचीही कसून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.