आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाय प्रोफाईल सेक्‍स रॅकेटः लोकप्रिय सास-बहू मालिकांमधील 5 अभिनेत्री अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई पोलिसांनी एक हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. विशेष म्‍हणजे त्‍यात लोकप्रिय सास-बहू मालिकांमधील 5 अभिनेत्रींचा समावेश असून एका आयएएस अधिका-याच्‍या घरातून हा प्रकार सुरु होता. या अधिका-याच्‍याच घरी छापा मारून 5 अभिनेत्रींना अटक करण्‍यात आली. टीव्‍ही मालिकांसह त्‍यांनी भोजपूरी चित्रपटांमध्‍येही काम केले आहे.

मुंबई पोलिसांच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, काल रात्री छापा मारण्‍यात आला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून बड्या हस्‍ती त्‍यात गुंतल्‍याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी इम्तियाज खान या मुख्‍य दलालासोबत बनावट ग्राहकाच्‍या माध्‍यमातून संपर्क केला होता. एक लाख रुपयांपासून सौद्याची बोली सुरु झाली. त्‍यानंतर दलालाने 25 हजारांमध्‍ये सौदा ठरविला. तो नंतर प्रतिष्‍ठीत लोखंडवाला कॉम्‍प्‍लेक्‍समध्‍ये त्‍यांना घेऊन गेला. तिथे त्‍याने एका फ्लॅटमध्‍ये नेले. या फ्लॅटमध्‍ये पाचही अभिनेत्री उपस्थित होत्‍या. त्‍यांना रंगेहाथ पकडण्‍यात आले.