आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरी: मातीखाली 12 जण दबल्याची भीती, NDRF ला 3 मृतदेह सापडले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये मातीचा ढिगारा कोसळून याखाली 3 घरातील 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दाभोळ परिसरातील टेमकरवाडी येथील ही घटना आहे. एनडीआरएफ टीमने आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे, तर ढिगा-याखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी एनडीआरएफ प्रयत्न करीत आहे. रत्नागिरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून सततच्या पावसाने माती, दगड ठिसूळ होऊन येथे दरडी कोसळत आहे.
भिंत कोसळून नेरळमध्ये 5 ठार
रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथील मोहाचीवाडी येथे घराची भिंत कोसळून 5 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. किसन दिघे, सुनंदा दिघे, स्वप्नेष दिघे, जाईबाई कदम, अर्चना दिघे अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. गेल्या 4 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसानं उरण, अलिबाग, पेण परिसराला झोडपून काढले आहे. सलग सुरु असणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत.
बातम्या आणखी आहेत...