आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरणमध्‍ये दहशतवादी दिसलेच नाहीत, थ्र‍िल अनुभवण्‍यासाठी शाळकरी मुलीचे Bluff

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रायगड जिल्ह्यातील उरणच्या नौदल तळाजवळ पाच ते सहा बंदूकधारी व्यक्ती संशयित हालचाली करताना दिसल्‍याचे शाळकरी मुलींनी सांगितले होते. त्‍यामुळे राज्‍यभर खळबळ उडाली होती. शिवाय तपास आणि सुरक्षा यंत्रणेने संपूर्ण मुंबई किनारा व आसपासच्या परिसरात हायअलर्ट जारी करून युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली होती. मात्र, आपल्‍याला दहशतवादी दिसले नव्‍हते. केवळ थ्रिल अनुभवण्‍यासाठी ही माहिती आपण पसरवल्‍याचे एका शाळकरी मुलीने पोलिसांना सांगितले. त्‍यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे.
समज देऊन सोडून दिले
- बंदुकधारी व्‍यक्‍तींना पाहिल्‍याचे एका 12 वर्षीय मुलीने पोलिसांना सांगितले होते.
- मात्र, आपण स्‍वत:हून ही अफवा पसवल्‍याचे तिने कबुल केल्‍याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
- त्‍या नंतर पोलिसांनी या मुलीना समज देऊन सोडून दिले.
फोटो पाहून केले वर्णण
- या मुलीने सांगितले, आपण काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेटच्या शस्त्रधारी दहशतवाद्यांचे फोटो पाहिले होते.
- फोटो पाहिल्यानंतर उरणमध्ये पठाणी सुट घातलेले, वेगळ्या भाषेत बोलणारे आणि शस्त्रधारी 4-5 संशयित पाहिल्याची अफवा केवळ 'थ्रील' अनुभवण्यासाठी पसरवली.
- एवढेच नाही तर त्‍यांच्‍या माहितीच्‍या आधारे पोलिसांनी रेखाचित्रं तयार करून घेतली होती.

तिघांना घेतले होते ताब्‍यात
- या नंतर तपास यंत्रणेने उरणमधील गव्हाण गावातून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कशी राबवली होती शोध मोहीम...
बातम्या आणखी आहेत...