आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मंडप बोगद्यात ट्रक, लक्झरी बस आणि तीन कार एकमेकांवर आदळल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मंडप बोगद्यात विचित्र अपघात झाला. ट्रक, खासगी बस आणि तीन कार एकमेंकावर जाऊन आदळल्या. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नवी मुंबईतील कामोठे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, ट्रक, तीन कार आणि खासगी बस एकमेकांना जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. पाच-सहा गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघातस्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली. या अपघातामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मंडप बोगद्यात झालेल्या विचित्र अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...