आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी महावितरणला पाठवणार राज्यभरातून 5 लाख तक्रार अर्ज; बिलात दुरुस्तीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मार्चपासूनचे कृषिपंपांचे वाढीव वीज बिल रद्द करावे तसेच कृषी संजीवनी योजनेत थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देऊन एप्रिलपासूनची सर्व वीज बिले दुरुस्त करून मिळावी या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज आंदोलन सुरू केले आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत महावितरणला किमान ५ लाख शेतकरी कर्ज पाठवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी बुधवारी दिली.  


२०१० ते २०११ पासून राज्यातील सर्व शेतीपंपांची वीज ग्राहकांची बिले वाढवण्यात आली आहेत. मीटर नसलेल्या ग्राहकांना ३ हॉर्सपॉवरऐवजी ५ हॉर्सपॉवरचे, तर ७.५ हॉर्सपॉवरच्या कृषिपंपांना १० हॉर्सपॉवरची बिले देण्यात आली आहेत. मीटर असणाऱ्या  कृषिपंपांनासुद्धा  सरासरी १२५ युनिटप्रमाणे वीज बिले पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे  वीज बिले फुगलेली असून  प्रत्येक शेतकऱ्याच्या बिलात ४०% थकबाकी बोगस  आहे, असा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे. मार्च २०१६ अखेर संपलेल्या कृषी संजीवनी योजनेत थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात आली होती. ती सूट पुन्हा लागू करण्यात आली पाहिजे तसेच अचूक बिले दिली पाहिजेत, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेच्या होगाडे यांनी या वेळी  केली आहे. 

 

३० रुपये देणे असताना  दाखवले शंभर रुपये 
शेतकऱ्यांची कृषिपंपाचे देणे ३० रुपये असताना महावितरणने ते १०० रुपये दाखवले असून सध्या वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राज्यभर सुरू आहे. महावितरणची मोहीम शेतकरी ग्राहकांवर अन्याय करणारी असून त्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणला पाच लाख अर्ज पाठवण्याचे ठरवले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...