आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : संपत्‍तीच्‍या वादातून 5 महिन्‍याच्‍या बाळाची गळा चिरून हत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - संपत्‍तीच्‍या वाद विकोपाला गेला नि एका युवकाने 5 महिन्याच्या निष्पाप चुलत भावाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून केला. काळजाला चटका लावणरी ही घटना ठाण्‍यातील नळपाडा भागात घडली. या युवकाने त्‍याच्‍या काकुवरही वार करून तिला जखमी केले. आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी या युवकाच्‍या काकुने केली आहे. पोलिसांनी आरोपी संजय चौहान व त्याची आई प्यारीदेवी यांना अटक केली आहे.
मुळेचे उत्‍तर प्रदेशातील असलेले मोहन चौहान व त्‍याचा मोठा भाऊ फागुलाल हे दोघे ठाण्‍यातील नळपाडा भागात राहतात. या दोघांमध्‍ये गावाकडील राहत्‍या घरावरून वाद झाला. महिलांमध्‍ये सुरू झालेले भांडण चांगलेच भडकले. प्यारीदेवी व तिचा 20 वर्षीय मुलगा संजय यांनी सुनिताला मारहाण केली. संजयने रागाच्‍या भरात तीक्ष्ण हत्याराने काकू सुनिता हिच्‍या अंगावर सपासप वार केले. हरिओम नावाच्‍या 5 महिन्‍याच्‍या निष्‍पाप मुलावरही त्‍याने वार केला. या घटनेत चिमुकल्‍याचा मृत्‍यू झाला. सुनिता यांना तत्‍काळ हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा..
औरंगाबाद- नोकरीचे आमिष दाखवून 2 लाखांचा गंडा, पोलिसात गुन्‍हा
नागपूर- भाचा- भाचीच्‍या हत्‍या प्रकरणातील फरार मामाला अटक
पुणे - दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफ करा- कुलगुरूंना निवेदन