आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेबी पाटणकर ड्रग्ज प्रकरण: मुंबईतील 5 वरिष्ठ पोलिस अधिका-यांना पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ड्रगमाफिया लेडी म्हणून पुढे आलेल्या शशिकला उर्फ बेबी पाटणकर हिला या व्यवसायात सर्वतोपरी मदत केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री 5 वरिष्ठ पोलिस अधिका-यांना अटक केली आहे. अमली पदार्थविरोधी पथकातील आझाद मैदान युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास गोखले, पोलिस निरीक्षक गौतम गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर सारंग, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्योतीराम माने यांच्यासह पोलिस शिपाई यशवंत पार्टे अशी अटक केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांची नावे आहेत. हे सर्व पोलिस कर्मचारी अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटकेत असलेली ड्रग्ज माफिया बेबी पाटणकर हिच्याशी संपर्कात असल्याचे समोर आले आल्यानंतर गुन्हे शाखेने हे पाऊल उचलले आहे. या सर्वांना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्याचा तत्कालीन कॉन्स्टेबल धर्मराज काळोखे याच्याकडे लाखो रुपयांचा एमडी (110 किलो) ड्रग्ज सापडला होता. याप्रकरणी त्याला अटक झाल्यानंतर बेबी पाटणकरचेही नाव समोर आले होते. काळोखेला सदर ड्रग्ज बेबी पाटणकरने दिल्याचे स्पष्ट होताच सातारा व मुंबई पोलिस बेबीच्या मागावर होते. मात्र बेबी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होती. अखेर तांत्रिक तपासात मुंबईतील काही वरिष्ठ पोलिस अधिकारी बेबीच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. अखेर काही दिवसानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तिलाही अटक केली. पुढे केलेल्या तपासात पाच पोलीस बेबीच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे बेबीच्या संपर्कात असलेल्या सर्वच पोलिसांची चौकशी गुन्हे शाखेने केली होती. यात काही धक्कादायक माहिती पुढे आली.
अमली पदार्थविरोधी पथकातील आझाद मैदान युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास गोखले यांनी एमडी ड्रग विकणा-या तस्करांविरोधात मोहिम उघडली होती. मात्र गोखलेंनी ही कारवाई बेबी पाटणकरचा व्यवसाय वाढविण्यासाठीच केल्याचे उघड झाले. आता सर्व पोलिस अधिका-यांना अटक करून प्रत्येक कारवाईची झाडाझडती गुन्हे शाखा पुन्हा नव्याने घेणार आहे. बेबीला सुरक्षित करण्यासाठी, बेबीचा धंदा वाढण्यासाठी गोखले यांनी तिचे स्पर्धक कारवाईच्या नावाखाली नामशेष केले असे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, एमडी म्हणजेच ‘म्याव म्याव’च्या तस्करीतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होणार असून यामध्ये काही अतिवरिष्ठ पोलिस अधिका-यांची देखील नावे पुढे येण्याची शक्यता तेव्हा वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांच्या मदतीनेच बेबी देत होती गुंगारा-
धर्मराज काळोखेसह मुंबईतील काही लाचखोर पोलिस अधिका-यांना हाताशी धरून अमली पदार्थाची तस्करी करणा-या आणि पोलिसांच्या मदतीने 40 दिवस गुंगारा देणार्‍या शकुंतला ऊर्फ बेबी पाटणकरला पनवेल येथून पकडले होते. समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना बेबी एका लक्झरी बसने कुडाळहून मुंबईत येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून बेबीला पकडले होते. मात्र 40 दिवस ती पोलिस अधिका-यांच्या मदतीनेच गुंगारा देण्यात यशस्वी होत होती असे तपासात स्पष्ट झाले आहे.
पुढे वाचा, पोलिसांनाच सोबत घेऊन बेबीने काळोखेला अडकविले-
बातम्या आणखी आहेत...