आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या समुद्रात पाच मजली तरंगत्या हॉटेलची मौज भारी !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘समुद्रात तरंगत्या हॉटेलमध्ये खमंग, लज्जतदार जेवणाचा आस्वाद घेत सैरही करता आली तर? काहीसे स्वप्नातले वाटणारे हे दृश्य अाता प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार अाहे.  वांद्रे वरळी सी - िलंकच्या नजीकच्या जेट्टीवर देशातील पहिले तरंगते हाॅटेल सुरू झाले अाहे. त्यामुळे मुंबईत पर्यटनासाठी अाल्यानंतर  गेट वे आॅफ इंडिया, म्युझियम, हेरिटेज वास्तू, हॉटेल, चौपाट्या , धार्मिक स्थळांंबराेबरच  पर्यटकांना अाता मुंबईच्या समुद्रात ३६० अंशात अथांग सागर अाणि भव्य मुंबईचे दर्शन या तरंगत्या एबी सेलेस्टिअल हाॅटेलमधून लुटता येणार अाहे. 
 
मुंबईत येणाऱ्या हजाराे पर्यटकांना येथील जुन्या वास्तू, संग्रहालय, गेटवे अाॅफ इंिडया, म्युझियम,  चाैपाटी अाणि धार्मिक स्थळे नेहमीच खुणावत असतात.  त्यातून अाता राज्य सरकारने  चाैपाट्यांचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी याेजना अाखली अाहे. त्यादृष्टीने या अनाेख्या तरंगत्या हाॅटेलचे महत्त्व वाढणार अाहे.  गोव्याच्या धर्तीवर मुंबईच्या  पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने  डब्ल्यूबी इंटरनॅशनल कन्सल्टंटट्स ,  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ  आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहयाेगातून हा अनाेेखा हाॅटेलचा पहिलावहिला उपक्रम राबवण्यात अाला अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हाॅटेलचे उद‌्घाटन शनिवारी करण्यात अाले. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद‌्घाटन, देशातील पहिलेच तरंगते हाॅटेल
- पंचतारांिकत हाॅटेल म्हणजे एक जहाज असून ते पाचमजली अाहे.   
- जहाजाबराेबरच हाॅटेलची रचना अाणि त्यासंबंधित ज्ञान हे अमेरिकेतून अाणण्यात अाले अाहे.  
- पाचशेपेक्षा जास्त पर्यटकांना सामावून घेण्याची जहाजाची क्षमता.  
- िद्वस्तरीय मल्टी क्युझिन, दाेन रेस्टाॅरंट  २४ तास काॅफी शाॅप सुविधा  
- स्कायडेक, रेस्टाॅरंट लाउंज  ऑनलाइन बुकिंग आणि अल्पोपाहार, जेवण.
बातम्या आणखी आहेत...