आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Suspended Congress Mla May Suspension Lifted, Cm Meeting With All Party\'s Leaders

काँग्रेसच्या 5 आमदारांचेही निलंबन मागे? सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- गेल्या महिन्यात बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनादरम्यान राज्यापालांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून निलंबित केलेल्या 5 आमदारांचे निलंबन मागे घेण्याकरिता हालचाली सुरु झाल्या आहेत. नागपूरात विधीमंडळातील प्रधान सचिवांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे सोमवारीच निलंबन मागे घेतले गेले होते. त्यानंतर काँग्रेसनेही आपल्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी लावून धरली होती.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केलाच्या आरोपावरून कॉंग्रेसच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पाचही आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे. राहुल बोंद्रे (चिखली), अब्दुल सत्तार अब्दुल नबी (सिल्लोड), वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) अशी या निलंबित आमदारांची नावे आहेत.
राज्यपाल सी विद्यासागर राव आपल्या अभिभाषणाला विधिमंडळात प्रवेश करत असताना काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्तारुढ भाजपने केला होता. व्हिडिओ क्लिपमध्ये कॉग्रेसचे आमदार धक्काबुक्की करताना दिसत असल्याने 5 काँग्रेसच्या आमदारांना निलंबित करण्‍यात आले होते.