आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग, जहाज क्षेत्रात ५० लाख राेजगार निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महामार्ग अाणि नाैकानयन क्षेत्रात किमान ५० लाख राेजगार निर्मिती करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्याअंतर्गत सहा लाख काेटी रुपये खर्चाच्या अतिभव्य प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक अाणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
भारत अाणि श्रीलंका जाेडण्यासाठी २२ हजार काेटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येत असून या प्रकल्पाला अाशियाई विकास बँकेने निधी पुरवठा करण्यात स्वारस्य दाखवले अाहे. रस्ते क्षेत्रासाठी पाच लाख काेटी रुपये, तर जहाज क्षेत्रासाठी एक लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी एका कार्यक्रमात बाेलताना दिली. बांगलादेश, भूतान, भारत अाणि नेपाळ रस्तेजाेड प्रकल्पासाठी अाठ अब्ज डाॅलर खर्चाचा प्रकल्प माेटार वाहन करांतर्गत राबवण्यात येणार असून ताे पुढील दाेन वर्षांत पूर्ण हाेईल, असेही ते म्हणाले.
रखडलेल्या प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करणार
यूपीए सरकारच्या काळात रखडलेल्या महामार्ग प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्यात येत असून खासगी- सार्वजनिक भागीदारी पद्धतीलाही वेग मिळत असल्याचे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, गेल्या वर्षात केवळ पाच प्रकल्प पुढे अाले. त्यामुळे देशात खासगी- सार्वजनिक भागीदारी शक्य हाेणार नाही असे म्हटले जात हाेते. पण गेल्या तीन महिन्यांत अाम्ही केवळ नऊ माेठे अशा पद्धतीचे प्रकल्प मंजूर केले अाहेत, त्याचप्रमाणे हायब्रीड पद्धतीने १७ प्रकल्प करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. २०१४-१५ वर्षात केवळ ६,३०० काेटी रुपयांचे प्रकल्प देण्यात अाले, परंतु यंदाच्या वर्षात १३,५०० काेटी रुपयांचे प्रकल्प देण्यात अाले अाहेत. मागील वर्षात पीपीपी तत्त्वावर केवळ दाेन प्रकल्प देण्यात अाले हाेते.
छायाचित्र: महामार्गाची साधने या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना नितीन गडकरी.
बातम्या आणखी आहेत...