आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 50 Lakh Extra Fund To Mla For Drought, Finance Minister Announcement

दुष्काळामुळे आमदारांना ५० लाखांचा जादा निधी, अर्थमंत्र्यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा सदस्यांना देण्यात येणारा २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा २ कोटींचा आमदार फंड एप्रिलपासून मिळणारच आहे, मात्र सध्या राज्याच्या बहुतांश भागाला दुष्काळाचे चटके बसत असल्याने या भागाला मदतीच्या नावाखाली विशेष बाब म्हणून आमदारांना प्रत्येकी ५० लाखांचा अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
याबाबतचा शासन निर्णयही लगेच काढण्यात आला. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वर्षात आमदारांना प्रत्येकी दोन कोटींचा निधी मिळतो. निवडणुकीपूर्वी २०१४-१५ या वर्षासाठी तत्कालीन आमदारांना निधी देण्यात आला होता. निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी तो खर्चून टाकला. त्यामुळे एप्रिलपर्यंतच्या काळासाठी नव्या आमदारांकडे विकासकामांसाठी निधीच उरला नव्हता. त्यातच सध्या दुष्काळामुळे जनता आमदाराकडे मदतीची मागणी करत आहे. त्यामुळे हा निधी दिला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.