आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत दर महिन्याला बलात्काराच्या 50 घटना; महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दोन दिवसात सामूहिक बलात्काराच्या दोन घटना मुंबईत घडलेल्या आहेत. एका घटनेतील आरोपींची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. दुसरीकडे एका प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. एका घटनेतील आरोपी हा मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. वांद्र्यातही एका मुलीशी अश्लील कृत्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सर्व घटनांमुळे मुंबई महिलांसाठी किती सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
आरोपींना शोधण्यातही अपयश
मुंबई पोलिसांची आकडेवारी सांगत आहे की, दर महिन्याला शहरात बलात्काराच्या 50 घटना घडतात. यापैकी 15 टक्के गुन्हेगारांना शोधण्यात पोलिसांना अपयश येते. चिमुकल्यांसोबत घडलेल्या लैगिक अत्याचाराच्या घटनेतील 79 टक्के घटनांमधील आरोपी पकडले जातात. यावर्षी दोन जुलैपर्यंत बलात्काराचे 342 गुन्हे नोंदविण्यात आले. त्यातील 53 गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मे महिन्यात बलात्काराच्या 55 तर जून महिन्यात 51 घटना घडल्या. गतवर्षी पोलिसांकडे बलात्काराच्या 712 घटनांची नोंद आहे. यापैकी 632 गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांना गुन्हेगारांना शोधण्यात येणाऱ्या अपयशाबद्दल सहपोलिस आयुक्त देवेन भारतींशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. 
बातम्या आणखी आहेत...