आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 50 Years Old Women Attacked In Mumbai At Local Railway

मुंबईत लोकलमध्ये भाजी विक्रेत्या महिलेवर चाकूहल्ला, जागीच मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत विरार ते चर्चगेट या लोकल रेल्वेत आज पहाटे एका 50 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेवर चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. पन्ना जनिया अंधेर असे या महिलेचे नाव असून त्या सोपारा-डोंगरी गास गावातील रहिवाशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेर या पहाटे आज विरारकडून चर्चकडे जाणा-या लोकलमध्ये बसल्या. त्या भाजी विक्रीचे काम करतात. त्यामुळे त्या रोजच पहाटे रवाना होतात. मात्र आज पहाटे एका अज्ञात हल्लेखोराने पहाटे 4 च्या सुमारास नालासोपारा ते वसई दरम्यान त्यांच्या पोटात चाकूने वार केले. त्यानंतर हा हल्लेखोर फरार झाला. त्यानंतर अंधेर यांना वसईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.