आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात फक्त 500 मेगावॅट विजेची कमतरता : अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य 82 टक्के भारनियमनमुक्त झाल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी भारनियमनाबद्दल विरोधकांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले. दाभोळ आणि परळीचे विद्युत केंद्र बंद असतानाही राज्यात केवळ 500 मेगावॅट विजेची तूट असल्याचे त्यांनी मंगळवारी विधिमंडळात अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

राज्यात सध्या 14,700 मेगावॅट विजेची मागणी असून 14,200 मेगावॅट वीज उपलब्ध आहे. गेल्या 10 वर्षांत वीज गळती 31 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर कमी करण्यात यश मिळाले आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी रात्री आठ तास 2.50 रुपये प्रति युनिट दराने विजेचा पुरवठा केला जातो.

विरोधकांनी राज्यात कमी गुंतवणूक झाल्याचे सांगत गुजरातबरोबर केलेली तुलना चुकीची आहे. उद्योगांना पुरवण्यात येणाºया 24 तास विजेमुळे केरळ, तामिळनाडू येथील वस्त्रोद्योग कंपन्या महाराष्ट्रात आल्याचे पवार म्हणाले.

सिंचनाची अचूक पद्धत ठरवू
सिंचनाची आकडेवारी उपलब्ध नसल्याबद्दलही पवार यांनी स्पष्टीकरण दिले. लाभक्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील सिंचन मिळून आकडेवारी काढली जाते. मात्र लाभक्षेत्राबाहेरील सिंचन मोजण्याची आकडेवारी उपलब्ध नव्हती, ती अंदाजे दिली जायची. पण आता एसआयटीची घोषणा केल्यानंतर लाभक्षेत्राबाहेरील सिंचन मोजण्याची अचूक पद्धत ठरवण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.