आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवशी बीडचे ५२ स्वातंत्र्यसैनिक, मुख्यमंत्र्यांनी ८८ जणांना दर्जा दिल्याचे उजेडात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जप्ती वॉरंट अयोग्य मानत ज्या निवृत्त न्या. ए. बी. पालकर आयोगाने स्वातंत्र्यसैनिकांची २९८ प्रकरणे रद्दबातल ठरवली होती त्याच जप्ती वॉरंटच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दिवशी ८८ जणांना नव्याने स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा दिल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. यात ५२ जण बीडचे आहेत, हे विशेष. या स्वातंत्र्यसैनिकाच्या पेन्शनमुळे तिजोरीवर ६ कोटी ५० लाख रु.चा भुर्दंड पडला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन प्रकरणाची माहिती मागितली होती. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या स्वातंत्र्यसैनिक कक्षाने कळवले की, १ जानेवारी २०१५ ते ५ जून २०१५पर्यंत एकूण ८८ स्वातंत्र्य सैनिक पेन्शन प्रकरणे मंजूर केली असून, यात ७९ बीड, १ नांदेड आणि प्रत्येकी ४-४ उस्मानाबाद व नगर अशी प्रकरणे आहेत. यापैकी अधिकांश प्रकरणांची ४ जुलै १९९५च्या निर्णयानुसार निकषाची पूर्तता होत नव्हती. यापूर्वी न्या. ए. बी. पालकर आयोगाने केलेल्या चौकशीत बीड जिल्ह्यात ३५५ पैकी २९८ स्वातंत्रअय सैैनिक बोगस असल्याचे आढळून आले होते.