आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 520 Candidates In Mumbai In Maharashtra Assembly Election

मुंबईत गुजराती ठरविणार 13 आमदारांचे भविष्य; 15 लाख मतदार कोणाकडे झुकणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक छायाचित्र)
मुंबई- मुंबईत सुमारे 35 लाख गुजराती लोक राहतात. यातील 15 लाख मतदार आहेत. मुंबईतील 36 पैकी 13 विधानसभा मतदारसंघात गुजराती मतदारांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच गुजराती मतदारांना मोठे महत्त्व आले आहे. कारण यापूर्वी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना हा समाज एकगठ्ठा मतदान करीत होता. आता मात्र भाजप व शिवसेनेचीच युती तुटल्याने गुजराती समाज भाजपकडे झुकणार की व्यक्ती पाहून मतदान करणार याकडे लक्ष लागले आहे.
गुजराती लोकांचा प्रभाव असलेले हे आहेत मतदारसंघ- मुंबईत एकून विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. यात दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मालाड-पश्चिम, गोरेगाव, विलेपार्ले, मुलुंड, घाटकोपर-पूर्व, घाटकोपर-पश्चिम, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या 13 मतदारसंघात गुजराती मतदार निर्णायत भूमिका बजावणार आहेत.
मुंबईत एकून 520 उमेदवार रिंगणात- मुंबईतील 36 जागांवर एकून 520 उमेदवार उभे राहिले आहेत. यात मुंबई शहरात मोडणा-या 10 विधानसभा मतदारसंघात एकून 139 उमेदवार उभे आहेत. तर, मुंबई पश्चिम व पूर्व उपनगरातील 26 जागांवर 381 उमेदवार रिंगणात आहेत.
- गुजराती बहुल घाटकोपर-पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश मेहता (भाजपा), प्रविण छेड़ा (काँग्रेस), राखी जाधव (राष्ट्रवादी), जगदीश चौधरी (शिवसेना) आणि सतिश नारकर (मनसे) आदी उमेदवार आहेत.
- घाटकोपर-पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार राम कदम (भाजपा), सुधीर मोरे (शिवसेना), दिलीप लांडे (मनसे), हारुन खान (राष्ट्रवादी) आणि रामगोविंद यादव (काँग्रेस) मैदानात आहेत.
- दहिसरमध्ये विद्यमान आमदार विनोद घोसाळकर (शिवसेना), नगरसेविका शीतल म्हात्रे (काँग्रेस), नगरसेविका मनीषा चौधरी (भाजपा), पूर्व महापौर डॉ. शुभा राऊळ (मनसे) आणि हरिश शेट्‌टी (राष्ट्रवादी) निवडणूक लढवित आहेत.
- बोरीवलीतून विनोद तावडे (भाजपा), अशोक सूत्राले (काँग्रेस), बलबीर सिंह (राष्ट्रवादी), उत्तमप्रकाश अग्रवाल (शिवसेना) आणि नयन कदम (मनसे) उभे आहेत.
- विलेपार्लेमधून काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे, माजी नगरसेवक पराग आळवणी (भाजपा), शशिकांत पाटकर (शिवसेना) आणि सुहास शिंदे (मनसे) हे नशिब अजमावत आहेत.